राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली यांचेकडील योजना (NSFDC)

मुदत कर्ज योजना (TERM LOAN)

सदर योजनेअंतर्गत विविध व्यवसायाकरिता एन. एस. एफ. डी. सी. मार्फत रु. ५ लाखांपर्यंत गुंतवणूक असलेल्या व्यवसायांच्या योजनांना मुदत कर्ज दिले जाते. कर्ज फेडीची मुदत एन. एस. एफ. डी. सी. ठरवेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत असेल. एन. एस. एफ. डी. सी. च्या कर्ज रकमेवरील व्याजाचा दर ६% व महामंडळाच्या कर्ज रकमेवरील व्याजाचा दर ४% असेल. महामंडळाच्या कर्ज रकमेची परतफेड एन. एस. एफ. डी. सी. च्या कर्ज रकमेच्या परतफेडीसह करावयाची आहे.

लघुऋण वित्त योजना (MCF)

एन. एस. एफ. डी. सी. योजनेअंतर्गत लघुऋण वित्त योजना सन २०००-०१ पासून राबविण्यात येते. सादर योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी एन. एस. एफ. डी. सी. चे मुदत कर्ज रु. ४०,००० व महामंडळाचे अनुदान रु. १०,००० असे एकूण रु. ५०,००० च्या मर्यादेत लघु उद्योगांमध्ये लाभ देण्यात येतो. यामध्ये ५०% शहरी व ५०% ग्रामीण भागातील लाभार्थीना दर साल दर शेकडा ५% व्याज दराने लाभ दिला जातो.

महिला समृद्धी योजना (MSY)

ही योजना सन २००४-०५ पासून महामंडळामार्फत राबवण्यात येत आहे. सदर योजना एन. एस. एफ. डी. सी. कडून प्राप्त होणाऱ्या निधीतून राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी एन. एस. एफ. डी. सी. मुदत कर्ज रु. ४०,००० व महामंडळाचे अनुदान रु. १०,००० असे एकूण ५०,००० च्या मर्यादेत लाभ देण्यात येतो. सदर योजना ही फक्त महिला लाभार्थींच्या आर्थिक विकासासाठी राबविण्यात येते. यामध्ये प्राधान्याने परितक्त्या, विधवा व निराधार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. (यामध्ये ५०% शहरी व ५०% ग्रामीण भागातील महिलांना दर साल दर शेकडा ४% व्याज दराने लाभ देण्यात येतो) एन. एस. एफ. डी. सी. योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा शहरी रु. १,०३,००० व ग्रामीण रु. ८१,००० शासन निर्णय क्र. मकवा - २०१३/ प्र. क्र. १४९ महामंडळ दि. १४ मे २०१२ नुसार महामंडळाच्या अर्थसहाय्यासाठी लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येत आहे.

महिला किसान योजना (MKY)

एन. एस. एफ. डी. सी., दिल्ली ह्यांच्या सहकार्याने फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी सदर योजना राबविण्यात येते. या योजनेतील मुख्य अट अर्जदाराच्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. योजनेची प्रकल्प मर्यादा रु. ५०,००० असून एन. एस. एफ. डी. सी. चा सहभाग रु. ४०,००० तर त्यांचा व्याजदर ५% आहे व महामंडळाचे अनुदान रु. १०,००० आहे.

शैक्षणिक कर्ज योजना (EDUCATION LOAN)

कर्जाचा उद्देश -

ज्या अभ्यासक्रमांना समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती/ शिक्षण फी/ परीक्षा फी अदा केली जात नाही अशा विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमाकरिताच महामंडळाच्या मार्फत शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या खालील बाबींचा अंतर्भाव कर्जामध्ये असेल.

१. प्रवेश फी व शिकवणी फी

२. अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी पुस्तके, लेखनसाहित्य व इतर आवश्यक साधने

३. परिक्षा फी

४. राहण्याचा व जेवण्याचा खर्च

५. अर्जदाराच्या कर्जफेडीपूर्वी त्याला मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून उतरवण्यात येणारा विमा पॉलिसी हप्ता

६. परदेशात शिक्षण घेताना येणारा प्रवास खर्च व शिक्षणाच्या कालावधीसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद इ.

७. संभाव्य खर्च (Caution money) व विकास निधी इ.- विद्यार्थ्याने शासकीय शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावयाचा असून महामंडळाने त्याची खात्री केल्यानंतर शैक्षणिक कर्जाची रक्कम संबंधित संस्थेच्या नांवे महामंडळातर्फे वितरित केली जाईल. परदेशातील शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात सदर संस्थांना विद्यापीठाची मान्यता प्राप्त झालेली असावी.

पात्रता -

१. विद्यार्थी अनुसूचित जातीतील मातंग समाज किंवा त्यातील बारा पोटजातीतील असावा.

२. व्यावसायिक/ तांत्रिक

पात्र विद्यार्थ्यांना देशातील व परदेशातील शासनमान्य व अधिकृत संस्थांमार्फत खालील प्रमाणे शिक्षण घेण्यास कर्ज वितरित केले जाईल. -

१. अभियांत्रिकी (Diploma/B.E./ /M.E./ B.Tech./M.Tech.

२. वास्तुविशारद (B. Arch./ M. Arch.)

३. वैद्यकीय (M.B.B.S./MD/MS/B.A.M.S./B.H.M.S.)

४. बायोटेक्नॉलॉजी / मायक्रो बायोलॉजी / क्लिनिकल टेक्नॉलॉजी (पदवी/ पदविका)

५. फार्मसी (B.Pharma/ M. Pharma)

६. दांत चिकित्सक (BDS/MDS)

७. फिजिओथेरपी (B.Sc/M.Sc)

८. पॅथॉलॉजी (B.Sc/M.Sc)

९. नर्सिंग (B.Sc/M.Sc)

१०. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (BCA/MCA)

११. मॅनेजमेंट (BBA/MBA)

१२. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी (पदविका/पदवी / उच्च पदवी)

१३. कायदा (LLB/LLM)

१४. एज्युकेशन (CT/NTT/B.Ed./M.Ed.)

१५. शारीरिक शिक्षण (CT/NTT/B.P.Ed./M.P.Ed.)

१६. जर्नालिझम व मास कम्युनिकेशन (पदवी / उच्च पदवी)

१७. वैमानिक प्रशिक्षण (पदविका/ उच्च पदवी)

१८. मिड वाईफ (सुईण) (पदविका)

१९. लॅबोरेटरी टेक्निशियन (पदविका)

२०. वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ४.५० लाख

वरील अभ्यासक्रमांव्यतिरिक्त काही व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही अंतर्भाव या योजनेत करण्यात आला असून ते अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत -

१. चार्टर्ड अकौंटन्सी (C.A.)

२. कॉस्ट अकौंटन्सी (ICWA)

३. कंपनी सेक्रेटरीशीप (CS)

४. अक्युरिअल सायन्सेस (B.Sc/M.Sc)

५. असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स अँड इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अर्जदाराने वरील अभ्यासक्रमासाठी अधिकृत प्रवेश घेणे आवश्यक राहील. उच्च शिक्षण उदा. एमफिल/ पीएचडी यासाठी नामांकित मान्यताप्राप्त संस्थेमार्फत अधिकृत प्रवेश घेणे आवश्यक आहे.

कर्ज मर्यादा -

१. देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रक्कम रु. १० लाख

२. परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम रु. २० लाख एन. एस. एफ. डी. सी. मार्फत देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी एकूण शैक्षणिक फीच्या ९०% प्रतिवर्षी तसेच परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम रु. ३. ७५ लाख प्रति वर्षी प्रमाणे सरासरी ४ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कर्ज देण्यात येईल. सदर कर्ज रकमेवर ५% द. सा. द. शे. व महिला अर्जदारास ४% द. सा. द. शे. व्याजदर आकारण्यात येईल.

टीप -

लाभार्थ्याने कर्ज प्रस्ताव स्वतः महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात दाखल करावा. त्यासाठी महामंडळाने कोणतेही मध्यस्थ नेमलेले नाहीत.

Scheme of National Schedule Castes Finance & Development Corporation, Delhi (NSFDC)

Term Loan Scheme (TERM LOAN)

NSFDC offers loans for various businesses having investment limit up to Rs. 5 Lakh as a part of this scheme. Loan repayment period will be as per the decision of NSFDC which will be up to 5 years. The rate of interest on the loan amount of NSFDC would be 6% and the interest rate on the corporation's loan amount would be 4%. Corporation’s loan is to be repaid while repaying the loan of NSFDC.

Short Term Finance Scheme (MCF)

Under NSFDC scheme, Short Term Finance Scheme has been implemented since 2000-01. Under this scheme of NSFDC, term loan amount of Rs. 40,000 along with corporation grant of Rs. 10,000 amounting to maximum of Rs. 50,000 is given to the beneficiary of small scale industries. 50% beneficiaries from the urban area and 50% from the rural areas are benefitted with this scheme with the interest rate of 5% per annum.

Women's Prosperity Scheme (MSY)

This scheme is being implemented by the corporation since 2004-05. It is implemented from the funds received by NSFDC. Under this scheme, total benefit of Rs. 50,000 is given per beneficiary - NSFDC term loan of Rs. 40,000 plus corporation of grant Rs. 10,000. This scheme is implemented only for the economic development of women beneficiaries. Priority is given to the survivors, widows etc for the actual benefit of this scheme. ( 50% urban women and 50% rural women are given benefit of this scheme with an interest rate of just 4% per annum). To get the financial assistance from this NSFDC scheme, the beneficiaries are selected from the lottery method. The income limit for Urban women is Rs. 1,03,000 and for rural women is Rs. 81,000 (GR - Makawa - 2013 / Pra. Kra. 149 dated 14th May, 2012)

Women's Farmer Scheme (MKY)

In association with NSFDC, Delhi this scheme is implemented only for the women belonging to rural areas. The main condition of this scheme is to have a land in the name of the applicant or the member of the family. Maximum project cost is Rs. 50,000 (Rupees Fifty Thousand only) out of which NSFDC, Delhi’s contribution is of Rs. 40,000 (Rupees Forty Thousand only) and corporation's grant is Rs. 10,000 and the interest rate is 5%.

EDUCATION LOAN

The purpose of the loan -

An educational loan scheme is implemented by the corporation for the courses which are affiliated & offered by the University & does not avail scholarships / education fees / examination fees from the Department of Social justice. The following items which are required to meet the academic curriculum will be included in the loan -

1. Admission fees and teaching fees

2. Books, stationery and other essential items required for the syllabus

3. Examination fees

4. Accommodation and food expenses

5. Insurance policy as a guarantee of repayment of loan if the applicant dies or gets handicapped before the loan repayment.

6. Provision for the cost of the travel expenses and the expenditure for the period of education, while studying abroad.

7. The future expenses (caution money) and development fund etc.- The student should take admission in the government education institute. Once the Corporation ensures the same, the amount of educational loan will be disbursed to the concerned institution on their name. In case of foreign educational institutions, these institutions should have received University approval.

Eligibility -

1. Students should be from the Scheduled Caste of Matang Society or its 12 sub-casts.

2. Professional / Technical

Loans will be distributed to eligible students through Indian and foreign government established educational institutions. -

1. Engineering (Diploma / BE / ME / B.Tech / M.Tech)

2. Architect (B. Arch / M. Arch)

3. Medical (M.B.B.S./ MD / MS / B.A.M.S./ B.H.M.S.)

4. Biotechnology / Micro Biology / Clinical Technology (Degree / Diploma)

5. Pharmacy (B.Pharma / M. Pharma)

6. Dentists (BDS / MDS)

7. Physiotherapy (B.Sc / M.Sc)

8. Pathology (B.Sc / M.Sc)

9. Nursing (B.Sc/M.Sc)

10. Information Technology (BCA / MCA)

11. Management (BBA / MBA)

12. Hotel Management and Catering Technology (Diploma / Degree / High Degree)

13. Law (LLB / LLM)

14. Education (CT / NTT / B.Ed. / M.Ed.)

15. Physical Education (CT / NTT / B.P.Ed. / M.P.Ed.)

16. Journalism and Mass Communication (Degree / High Degree)

17. Aeronautical Training (Diploma / High Degree)

18. MidWife (Midget) (Diploma)

19. Laboratory Technician (Diploma)

20. Annual Income Limit - Rs. 4.50 lakh

In addition to the above degree-diploma courses, some vocational courses have been included in this scheme, which are as follows -

1. Chartered Accountancy (C.A.)

2. Cost Accountancy (ICWA)

3. Company Secretaries (CS)

4. Actuarial Sciences (Degree/ Higher Degree / B.Sc / M.Sc)

5. The Associate Member of Institute of Engineers and Institute of Electronics and Telecommunication applicants must obtain official admission for the above courses. Higher education eg. For admission to M.Phil / PhD it is mandatary to get the official admission through renowned and recognized institution.

Loan Limit -

1. For domestic course, the amount is Rs. 10 Lakh

2. For the foreign curriculum, the amount is Rs. 20 Lakh. NSFDC will provide 90% loan amount on the total academic fee of that particular year for domestic courses and Rs. 3.75 lakhs per year for the foreign courses. Total tenure of the course will be average 4 year. Interest rates for this loan amount will be 5% and in case of female applicant, it will be 4%.

Note -

The beneficiary himself/herself should take the loan proposal to the office of the Corporation. The Corporation has not appointed any agent for this.