कर्ज मंजुरीची प्रक्रिया

व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

१. अर्जाचा फॉर्म सर्व जिल्हा कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

२. विहित नमुन्यातील अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात द्यावयाचा आहे.

अर्ज प्राप्त झाल्यावर महामंडळामार्फत करावयाची कार्यवाही –

महामंडळाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयात लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या विविध योजनांची सर्व कर्ज प्रकरणे, शासन निर्णय. क्र. मकवा २०१२/ प्र. क्र. १४९/ महामंडळे/ २०१२ दि. १४ मे २०१२ अन्वये, गठीत केलेल्या लाभार्थी निवड समिती समोर ठेवण्यात येतात. समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावास कर्ज मंजुरीसाठी महामंडळामार्फत शिफारस केली जाते. कर्ज मंजुरीची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. -

१. जिल्हा कार्यालयात विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना व बीज भांडवल योजनेखाली अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांनी अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कागदपत्रांची छाननी करून व आवश्यक त्या प्रकरणात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवालासह स्थानिक सेवाक्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेस मंजुरीसाठी शिफारस करतात.

२. जिल्हा कार्यालयात एन. एस. एफ. डी. सी. योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक रीतसर त्या प्रकरणाची नोंद करून कागदपत्रांची छाननी करून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्पष्ट अभिप्रायासह प्रादेशिक कार्यालयाकडे तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी शिफारस करतात.

३. प्रादेशिक कार्यालयामार्फत जिल्हावार कर्ज प्रकरणांची जेष्ठतेनुसार नोंद करून अर्जासोबत पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात येते व कर्ज प्रकरणांची मुख्य कार्यालयाकडे शिफारस करण्यात येते.

४. मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या व्यवसायनिहाय उद्दिष्टांप्रमाणे प्रादेशिक व्यवस्थापक योग्य त्या शिफारशींसह जिल्हावार जेष्ठतेनुसार कर्जप्रकरणे मंजुरीसाठी मुख्यालयास शिफारस करतात.

५. मुख्यालयात संबंधित शाखेत प्रादेशिक कार्यालयाकडून व्यवसायनिहाय आलेल्या कर्ज प्रकरणांची नोंद घेतली जाते व कर्ज प्रकरणाची छाननी करून निधी उपलब्धतेनुसार जेष्ठतेनुसार मंजुरी प्रदान केली जाते.

लाभार्थी निवड समितीची कार्यप्रणाली

Loan sanction process

Method of application process for financial assistance

1. The application form is available for free of charge in all district offices.

2. The prescribed form should be filled and attached with all the relevant documents and to be submitted at the district office.

Procedure to be done by the Corporation after receiving the application -

All the loan cases of different schemes received from the beneficiaries of all district level offices of the Corporation, as per GR No. MAKAVA 2012 / Pra. Ka. 149 / Corporations / 2012 dated May 14, 2012, will be placed in front of the Selection Committee. The proposals which are approved by the committee are recommended by the corporation for the loan sanction -

1. After receiving the application under Special Central Finance Scheme and Seed Capital Schemes in the District Office, the District Manager will scrutinize the entire documents linked to the application, will visit the actual site in case if required and prepare the report with recommend for the approval/sanction of the Nationalized Bank in the local services area.

2. In case of NSFDC scheme, after receiving the application in the district office, the District Manager, after registering the case, scrutinizes the documents and inspects the actual site and recommends the application to the Regional Office for further action by giving a clear opinion.

3. The Regional Offices registers all the cases- district wise, date wise and all the documents along with the applications are scrutinized & sent to the main office with the recommendations.

4. According to the business objectives given by the head office, the regional managers give their recommendations for various loans as per the seniority etc to the main office.

5. Businesswise proposals received from various regional offices are documented, scrutinized at head office & the sanction is done based on the availability of funds.

The functioning of the beneficiary selection committee