विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना (SCA)

अनुदान योजना

- प्रकल्प मर्यादा रु. ५०,००० पर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्प खर्चाच्या ५०% किंवा रु. १०,००० यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.

बँक कर्ज - अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्ज फेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.

प्रशिक्षण योजना (TRAINING SCHEME)

तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शासनमान्य संस्थांना प्रशिक्षणार्थी देण्यात येतात. प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते बारा महिने असतो.

संस्थांची फी

अ. तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. २,५००

आ. संगणक प्रशिक्षणासाठी एकूण प्रशिक्षण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. ३,५००

इ. वाहन चालक प्रशिक्षणासाठी एकूण प्राशिक्षण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी (चारचाकी वाहनासाठी) रु. २,३०० (तीन चाकी वाहनासाठी) रु. २,०००

ई. ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षार्थी फी रु. ३,५००

ड. शिवणकला प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीसाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. १,२००

फी व्यतिरिक्त विद्यावेतन

अ. प्रशिक्षणार्थी रहात असलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेत असल्यास प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा रु. १५०

आ. महानगपालिका क्षेत्रात राहणाऱ्या व प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीस दरमहा रु. २५०

इ. प्रशिक्षणार्थी रहात असलेल्या खेड्यात / शहराव्यतिरिक्त अन्य खेड्यात / शहरात प्रशिक्षण घेत असल्यास प्रतिमहा रु. ३००

Special Central Assistance Scheme (SCA)

Grant scheme

- There is a grant from the corporation for the project which has investment amount less than Rs. 50,000. The grant amount given is 50% of the project cost or Rs. 10,000 whichever is less.

Bank loan -All the other amount excluding grant is a bank loan. This loan is levied at the rate of the bank. The loan needs to be repaired in the same monthly payment of 36 to 60 rupees.

TRAINING SCHEME

The trainees are provided to the government recognised private organizations offering technical and vocational training. The duration of the training is six to twelve months.

Institution’s fees

For technical and vocational training, the total fee for the entire training period, per trainee is Rs. 2,500

For computer training, the total fee for the entire training period, per trainee is Rs. 3,500

For the training of the driver, the total fee for the entire training period, per trainee is (for the four wheelers) Rs. 2,300 & (for three wheelers) Rs. 2,000

For beauty parlour training, the total fee for the entire training period per trainee is Rs. 3,500

For Sewing Art, the total fee for the entire training period per trainee is Rs. 1,200

The Stipend, apart from fees

A. If the trainee is taking training in the place where he/she lives, then every trainee gets Rs. 150

B. The trainees who live in and out of the corporation area are given Rs. 250

C. If the trainee is taking training in his village, other villages / cities then Rs. 300